महाराष्ट्रात लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनावरांचे बाजार, शर्यती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच लम्पीमुळे दगावलेल्या जनावरांपोटी महिनाभरात शंभर टक्के मदत देणार असल्याचे महसूल व पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
लम्पीचा प्रादुर्भाव घटला
राज्यात लम्पी स्कीन आजाराचा
प्रादुर्भाव वाढत गेल्याने जनावरांचे बाजार, पशुधन
वाहतूक, शर्यती, मेळावे बंद केले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. आता लम्पीचा
प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला आहे.
गेल्या काही दिवसांत जनावरांचे मोठ्या
प्रमाणात लसीकरण करण्यात आले. नगर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार सुरु झाले असून, आता राज्यातील सर्व भागांत जनावरांचे बाजार, शर्यती सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
आतापर्यंत लम्पीमुळे राज्यात 30 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला असून, नुकसानग्रस्त पशुपालकांना मदत केली जाणार आहे. पुढील महिनाभरात शंभर टक्के
मदत केली जाईल, असे विखे म्हणाले. अशाच नवनवीन अपडेट साठी आदर्श समूहाला लाईक करा.
📲 आपण ग्रुप अँड्मीन असाल तर आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये अँड करा 8805826526
आणि रोजच्या रोज मोफत आपल्या ग्रुप मध्ये पोस्टिंग मिळवा. आपल्या
सर्व मित्रांना सुद्धा शेअर करा
-- आदर्श
उद्योग समूह (https://adarshudyog.blogspot.com/)

No comments:
Post a Comment